आठ महिन्यानंतर ६ जणांविरुध्द गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शिवशंकर कॉलनी भागात १९ सप्टेंबर २०२३ रोजी काही जणांनी दीपक दगडू भोई ( वय ३३, रा.शिवशंकर कॉलनी) यांना पत्नीला फारकत देऊन टाक, या कारणावरुन सहा जणांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तब्बल आठ महिन्यानंतर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक दगडू भोई हे व्यापारी असून, १९ सप्टेंबर २०२३ रोजी सहा जणांनी दीपकला त्याची पत्नीला फारकत देण्यास सांगितले. तसेच तर फारकत देणार नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशीही धमकी दिली. त्यानंतर दीपकला लाथा-बुक्कांनी मारहाण करुन त्याच्याकडील ५ हजार रुपये देखील लांबविले होते. या प्रकरणी बुधवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये दीपक भोईच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रविंद्र सोनार हे करत आहेत.