जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर रेल्वे रुळावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रामानंद नगर रोडवर राहणाऱ्या तरुणाने हरी विठ्ठल नगर रेल्वे रुळावरील लाईनवर मध्यरात्री १२ वाजता स्वतःला रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक भगवान महाजन (वय ३१, रा. चर्चजवळ, रामानंदनगर रोड, ह. मु. समता नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो समता नगरात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भावासह राहत होता. काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक विवंचनेतून दीपक आणि त्याचा परिवार रामानंद नगर रस्त्यावरील चर्चेजवळ भाड्याने घर घेऊन राहत होता.
सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्याने हरी विठ्ठल नगर जवळील रेल्वे रुळाजवळ रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.
कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला. रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.