जळगाव (प्रतिनिधी) – आज सोमवारीं करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात 475 आढळली असुन दिवसभरात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44372 झाली आहे. त्यापैकी 33566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत 1114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 9692 रुग्ण उपचार घेत आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 111, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ 43 , अमळनेर 45, चोपडा 39,पाचोरा 7, भडगाव 4, धरणगाव 22, यावल 20, एरंडोल 10, जामनेर 18, रावेर 45 , पारोळा 20, चाळीसगाव 43, मुक्ताईनगर 22, बोदवड 7, इतर जिल्ह्यातील 4 , आहेत 9692रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.