पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा नगरीचे रहिवाशी आणि मूळ गाव मंगरूळ येथील सासर असलेल्या आम्रपाली सुनील जाधव ह्या गजानन माध्यमिक विद्यालय आदर्शगाव राजवड या ठिकाणी विना अनुदानित शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. एका बाजूला बिन पगारी उपासी पोटी ज्ञान दानाचे कार्य आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानाची उपासना करत जाधव कुटुंब आपल्या घराण्याचे नवलौकिक करत समाजापुढे नवं नवीन आदर्श निर्माण करत एक वेगळे स्थान या परिवाराने निर्माण केले आहे.

वडिलांचे देहदान, संपूर्ण परिवाराने नेत्रदान संकल्प, विविध राष्ट्रीय शैक्षणिक सामाजिक उपक्रम यातून या शिक्षक दांपत्याने शिक्षकी पेशाचा गौरव आपल्या आचार, विचार आणि कृतीतून सिद्ध केला आहे. त्यातच अभिमानाची अभिमानाची बाब म्हणजे सोनी मराठी केबीसी, कोण होणार करोडपतीसाठी आम्रपाली सुनील जाधव यांची निवड झाल्यामुळे पारोळा नगरीचे आणि गजानन माध्यमिक विद्यालय आदर्शगाव राजवड याचे नाव के बी सी सेटवर झळकावून शाळा, शिक्षक, पारोळा नगरीचे नावलौकिक वाढवला आहे . एका बिन पगारी शाळेत काम करणारी शिक्षिका कोण होणार करोडपती खेळणार ही शिक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे . कोण होणार करोडपती साठी सोनी मराठी चॅनलवर झालेली ही निवड म्हणजे शिक्षक हा आजीवन विद्यार्थी असतो हे त्यांनी सिद्ध केले असून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि अमळनेर नगरपालिकेच्या नगर अध्येक्ष्या पुष्पलता ताई पाटील यांनी आम्रपाली जाधव यांचे अभिनंदन केले. आम्रपाली जाधव ह्या आदर्श शिक्षक सुनील भिवा जाधव यांच्या पत्नी आहेत . त्यांची निवड जळगाव जिल्ह्यातून एकमेव असून सर्वत्र समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे.







