अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचा पुढाकार
गुढे ता. भडगाव (प्रतिनिधी)-कोरोना संसर्गजन्य रोगाने संपूर्ण देशाला जगाला व्यापले आहे. यात शासकीय निमशासकीय अन्य राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गजन्य आजारांची लागण झाली आहे. या संसर्गाच्या उपचारासाठी लाखो रुपये कर्मचारी जीव वाचवण्यासाठी खर्ची घालत आहे. यामुळे कोवीड१९ आजाराच्या परिपूर्तीच्या प्रमुख आजारांंचा यादीत समावेश करावा व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांस अग्रीम तसेच राखीव कोवीड सेंटर कँशलेस मेडिकल सुविधा तसेच लिव्हर प्रत्यारोपण ,डेंगू नागिन ,आदी आजारांचा समावेश वैद्यकीय परिपूर्तीत समावेश करावा या मागणीसाठी अखिल प्राथमिक शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला आहे.
यासाठी जळगाव जिल्ह्यातून अखिल प्राथमिक शिक्षक संघाने शासनाकडे प्रस्ताव सादर करून वैशिष्ट्यपूर्ण मागणी केली आहे. तसेच या संबंधीची परिपूर्ण माहिती ही आरोग्य विभागाला पुरवली आहे. या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्यास राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा गंभीर आजारावर परिपूर्तीचा लाभ मिळणार आहे. यासाठी प्रस्तावाच्या मंजुरीसाठी लवकरच राज्याचे आरोग्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी दिली आहे.
शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चासाठी परिपूर्तीची तरतूद आहे. मात्र कोवीड १९वरच्या गंभीर आजाराची तरतूद केलेली नाही. हा आजार श्ववसन संस्थेशी संबंधित असल्याने फुफ्फुसाचे विकार यामध्ये समावेश असणे आवश्यक आहे. गेल्या सहा-सात महिन्यापासून संपूर्ण देश या महामारीला तोंड देत आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षक अधिकाऱ्यांसह अन्य संवर्गातील कर्मचाऱी जिवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडीत आहेत .प्रतिबंधीत क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम करताना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सनिध्यात येऊन कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांस संसर्ग झाल्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र या कर्मचाऱ्यांसाठी बेडची सोय उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे अद्याप कोवीडवर लस उपलब्ध नसल्याने खुल्या बाजारातून औषधी खरेदी करावी लागते आँक्सीजन, व्हेंटिलेटर चा खर्च आवाक्याबाहेर आहे परिणामी कर्ज घेऊन उपचार करावा लागत आहे.
कोवीड१९ हा जो आजार आहे तो श्वसन संबंधित आहे. त्यामुळे विविध तांत्रिक मुद्दयांवर शासनाच्या आधाराच्या सूचित १००टक्के बसतो तसेच आम्ही विविध मुद्द्यांचा आधारावर शासनास पटवून देणारआहोत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वित्तमंत्री अजित पवार यांचा यांची समक्ष भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आमदार खासदारांचे पत्र घेऊन राज्यभरातील लाखो कर्मचाऱ्यांना सदरचा आजार लाभ होईल यासाठी शिफारस पत्र घेऊन वरिष्ठांना सादर करणार आहोत. तसेच लिव्हर प्रत्यारोपण सोयरसिस डेंग्यू स्वाइन फ्लू या सूचीत समाविष्ट करण्यासंबंधी मागणी करण्यात आली आहे असे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी माहिती दिली आहे.