त्या अनोळखी इसमाचा आता खून झाल्याची नोंद: सावखेडा शिवरात मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) – अनेक दिवसांपासून शांत असलेल्या जळगावच्या शांंततेला दोन खुन्हाांच्या घटनांनी गालबोट लागले आहे़ गेंदालाल मील परिसरातील खुनाची घटना समोर आल्याच्या काही तासांनी आता अनोळखी मृतदेह आढळल्याच्या प्रकरणातही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़ त्यामुळे या दोन हत्येच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे़ एक शहर पोलीस ठाणे तर दुसरा तालुका पोलीस ठाण्यात आता रात्री दहा वाजता दाखल झाला आहे़
सावखेडा शिवरात सोमवारी संध्याकाळी एका अनोळखी २५ ते ३० वर्षीय तरूणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता़ प्राथमिक स्वरूपात यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मात्र, डॉक्टरांनी धक्कादायक अहवाल दिला़ या तरूणाच्या उोक्यात कुठल्यातरी हत्याराने वार झाला असून त्यातून झालेल्या दुखापतीने या तरूणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले़ आणि अखेर मंगळवारी रात्री दहा वाजता़ अज्ञात मारेक-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एका दिवसात दोन खुनाच्या घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे़ हा तरूण कोण, त्याला कोणी मारले असेल, नेमके कारण काय, पोलीस तपासात काय पुढे येइृल, असे अनेक प्रश्न यावरून समोर आले असून पोलिसांसमोर हे मोठे आव्हान असल्याचे चित्र आहे़.

वैजनाथ ता़ एरंडोल येथील शिवाजी पाटील यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आला़ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे, वासुदेव मराठे, सतीश हळणोर, यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला़ शवविच्छेदनानंतर खुन झाल्याचा उलगडा झाला आहे़
ती घटना ताजीच
शहरातील गेंदालाल मील परिसरात दारू आणण्यासाठी गाडी दिली नाही म्हणून हरिश्चंद्र अटवाल याने अरूण पवार याच्या डोक्यात फरशी टाकूण त्याची हत्या केली़ यात त्याला अटकही करण्यात आली आहे़ या घटनेनंतर पुन्हा एक खळबळजनक घटना समोर आली आहे़ त्यामुळे खळबळ उडाली आहे़







