जळगाव (प्रतिनिधी );– काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये ऑनलाईन रंगतरंग सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाईन रंगतरंग साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्त रंग-तरंग कला महोत्सव साजरा करण्यात आला .यामध्ये इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यानि वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला .यामध्ये चित्रकला , कार्यानुभव टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे, तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नाट्यछटा व वाद्यवादन असे कार्यक्रम सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गिटार ,तबला, कॅसिओ ,बासुरी असे विविध वाद्य वादन करून उत्तम प्रतिसाद दिला . नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नृत्य सादरीकरण हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये लोक नृत्य,सण आणि पौरानिक नृत्य ,एकल नृत्य असे विविध प्रकार देण्यात आले होते . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया, माध्यमिक विभाग समन्वयिका संगिता तळेले , प्राथमिक विभागाच्या समन्वयिका स्वाती अहिरराव ,पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका अनघा सागडे उपस्थित होत्या . या कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन निलेश बडगुजर , गणेश देसले ,स्वानंद देशमुख . यांनी केले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे ,समाधान पाटील यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.