जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून नारळ विक्रेत्याची मोटारसायकल अज्ञात भामट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, युवक काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष परवेज खान सरदार खान वय-३० रा. गणेश कॉलनी, जिल्हा पेठ यांचे गोलाणी मार्केटमधील दत्त मंदीराजवळ नारळाचे होलसेल दुकान आहे. दुकानाच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे एमएच १९ एव्ही ५२०२ क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे परवेज हे सकाळी ७ वाजता दुचाकीने आले. दत्त मंदीराजवळील पार्कींगच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग करून लावली. दुपारी ३ वाजता जेवणासाठी घरी जाण्यासाठी गेले असता दुचाकी मिळून आली नाही. सायंकाळपर्यंत दुचाकीचा शोधा शोध घेतला मिळून न आल्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात परवेज पठाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.