उमेदवार किशोर पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आरपीआय (आठवले गट)पिआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांची भव्य बाईक रॅलीचे शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी पाचोरा येथे दु. ३ वाजता व भडगाव येथे दु. ४ वाजता करण्यात आले आहे.तरी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. किशोर पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचाराने दिवसेंदिवस आघाडी घेतली आहे. सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनात किशोर पाटील हे लोकप्रिय उमेदवार झाले आहेत. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासाठी मेहनत घेत आहे. आता थेट अभिनेते गोविंदा यांनी किशोर पाटील यांच्यासाठी येण्याचे कबूल केल्याने मतदारसंघात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.