बंडखोर उमेदवारांचा आमदारांना धोका नसल्याचे चित्र
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह विविध पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरून लक्ष वेधून घेतले आहे. मात्र महायुतीचे उमेदवार किशोर धनसिंग पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली आहे.
मतदारसंघात विविध प्रचार फेरीत जनतेशी संवाद साधत आहेत. जनतेकडून किशोर पाटील यांना सकारात्मक प्रतिसाद लाभत असून त्यांचे महिला भगिणींकडून औक्षण केले जात आहे. गेल्या १० वर्षातील विविध विकास कामांच्या बळावर किशोर पाटील हे जनतेसमोर जात आहेत. त्यातूनच किशोर पाटील यांचे जनतेकडून स्वागत होत आहे.
गेली पंचवार्षिक काळात मतदारसंघात विकास कामे केली. यामुळे जनतेने खूप आशीर्वाद दिले. या विकासकामांमुळे व कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या सक्षम नेतृत्वाने मतदारसंघात विकासाची गंगा आली आहे. आताही पक्षाने संधी दिली असून त्यासाठी जनतेने आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने निवडून द्यावे असेही आवाहन किशोर पाटील यांनी केले आहे.