पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील निपाणे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर हे उपस्थित होते. या कामांमध्ये जिल्हा परिषद जनसुविधा निधीतून १५ लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या निपाणेे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण करणे, १५ वित्त आयोग मधून वॉल कंपाउंड १० लाख रुपये भूमिपूजन करणे, आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख रुपये अशा विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले.
यावेळी सरपंच ताराचंद पाटील, माजी सरपंच त्र्यंबक पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, डी. डी. पाटील, वाल्मिक पाटील, संतोष खैरे, दिपक सोनवणे, रामलाल पाटील, नथु महारु पाटील, सीताराम पाटील शरद पाटील, मयूर पाटील, दत्तू पाटील, मुरलीधर पाटील, अशोक पाटील, भाऊसाहेब पाटील, किशोर पाटील, ग्रामसेवक शरद पाटील, भीमराव भील, चंद्रभान पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.