जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. या वृत्ताला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुजोरा दिला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी पीआय म्हणून नियुक्ती झालेले पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले होते. परंतू नंतर या आदेशाला आयजी बी.जी.शेखर यांनी स्थगिती दिली होती. परंतू बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार देण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक मुंढे यांनी काढले आहेत. तर नजन पाटील यांनी पदभार देखील स्वीकारला असून पाचोरा पोलीस स्थानकाचा पदभार आता दुय्यम अधिकारी पुढील आदेश होईपर्यंत सांभाळणार आहेत.