किसान युवा क्रांती संघटनाचे निवेदन
जळगांव (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांना विना विलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांना आदेश द्यावेत यासाठी किसान युवा क्रांती संघटनातर्फे जिल्हाधिकारी याना बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे कि, शासनाने वेळोवेळी आदेश देऊनही बँक विविध अडचणी दाखवून शेतकऱयांना पीक कर्ज नाकारून अडचणीत आणीत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध विनाविलंब उपलब्ध करून देण्यास परिसरातील सर्व बँकांना आदेश देण्यात यावेत. बाजार समित्यांमध्ये व बाहेर व्यापारी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एमपएससी पेक्षा फारच कमी दराने शेत माल खरेदी करीत आहेत. याबाबत आदेश काढून एमएससी नुसार शेत माल खरेदी करण्याचे आदेश काढावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना तालुकाध्यक्ष दिगंबर पाटील आधी उपस्थित होते.







