जळगाव (प्रतिनिधी) – दि. 7 ऑगस्ट पासून मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल आता ट्रेंड सेटर बनली आहे कारण ती आता देवळाली आणि मुजफ्फरपूर दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे आणि दि. 17 ऑक्टोबर पर्यंतच्या 25 फेरीच्या माध्यमातून 3893 टन मालाची वाहतूक ही भुसावळ विभागातून करण्यात आली आहे .
किसान रेलमध्ये डाळिंब (अनार), कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फावरील मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली जाते. व इतर वस्तूंची वाहतूक केली गेली आहे.
या मालाची वाहतूक भुसावळ विभागातील प्रमुख स्टेशनवरून करण्यात आली आहे देवळाली,नाशिक, लासलगाव ,मनमाड ,जळगाव ,भुसावळ ,बुऱ्हाणपूर आणि खंडवा या ठिकाणाहून वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेल ला प्रतिसाद मिळत असून भुसावळ विभागातून दिनांक 15 ऑक्टोबरला 209 टन वाहतूक आणि दिनांक 17 ऑक्टोबरला 200 टन मालाची वाहतूक ही करण्यात आली आहे .
किसान रेल्वे दि. ७ ऑगस्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली आणि पुढे मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली आणि त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल त्रि-साप्ताहिक म्हणून चालू आहे, याला शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेमुळे नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, नाशवंत वस्तूंची ताजा डिलिवरी, मालाच्या संख्येवर बंधन नाही , रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत करणारी व त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आशा व संधी मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वे मुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे आणि ताजी वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने, फळांची मागणीत वाढ होत आहे. रेल्वे प्रशासन आवाहन करते की किसान रेलचा शेतकरी व इतर पार्सल लोडर्सनी लाभ घ्यावा.








