रावेर तालुक्यातील सावदा येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : सावद्यातील २४ वर्षीय तरुणावर एका कार्यक्रमात हातोड्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सैय्यद मोईन सैय्यद सलीम (वय २४, रा.बडाआखाडा, सावदा, ता.रावेर) हे बुधवार १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता आठवडे बाजार भागात सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सैय्यद मोईन आल्यानंतर संशयीत हैदर शेख मंजूर (बडा आखाडा, सावदा) हा देखील त्या कार्यक्रमात आला असता हैदरने हातातील लोखंडी हातोडा घेवून सैय्यद मोईन याच्या अंगावर उगारला.
मात्र वार वाचविण्याच्या प्रयत्नात हातोडा सैय्यद मोईन याच्या डोक्याला लागला. यात सैय्यद मोईन हा जखमी झाला. याप्रकरणी सैय्यद मोईन याने दिलेल्या फिर्यादीवरून हैदर शेख गुलाम मंजूर (३७, रा.बडाआखाडा, सावदा) याच्याविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करीत आहे.
रात्रीच घटनास्थळी जळगाव येथून फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले व त्यांनी तेथील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. घटनास्थळाचा पंचनामा देखील पोलिसांनी केला. या ठिकाणी पोलिसांनी रात्री बंदोबस्त ठेवला होता. हल्ल्यात जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.