मुंबई ( वृत्तसंस्था ) – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्र्ष्टाचाराचे आरोप केले होते. शरद पवार, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतीन अनेक नेत्यांवर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.
त्यानंतर सोमय्यांनी आज पुन्हा एकदा खळबळजनक ट्विट केलं आहे.सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, मी 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे आयकर विभाग, ईडी,सहकार मंत्रालायच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि 10 नोव्हेंबर ठाकरे सरकारचे मंत्री यांच्याविरोधात मुंबई येथे तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटमधून दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
याशिवाय किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये खळबळजनक खुलासाही केला आहे. तो म्हणजे, पुढील आठवड्यात ज्या 3 मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढणार त्यापैकी हा पहिला खुलासा अस सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांनी या ट्विटमधून नेमकं कोणावर निशाणा साधला आहे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतरही सोमय्यांनी आपलं आरोपाचं सत्र सुरूच ठेवलं आहे. मात्र यावेळी नेमंंक ते कुणाला लक्ष करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.