जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण सुभाष लाडवंजारी यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय यांचा राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक असलेले किरण लाडवंजारी यांनी जिल्हा परिषदेतंर्गत बजावलेल्या उत्कृष्ठ कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.राज्य शासनाच्या
ग्रामविकास विभागांतर्गत विविध प्रकल्प तसेच योजनांच्या अमालबजावणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने २००५-२००६ पासून सुरु केली आहे त्याचाच भाग म्हणून लाडवंजारी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.