भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकेगाव येथील श्रीराम नगर एमआयडीसी येथे एका किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने ड्रावर मधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार ३१ जुलै रात्री १० ते १ ऑगस्ट पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडला याप्रकरणी सहा ऑगस्ट रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान रामा बाविस्कर ( वय – ३८ ) यांचे सद्गुरु नावाचे किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने ड्रायव्हर मधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सोपान बाविस्कर यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला सहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी अमोल पवार करीत आहे.