यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किनगाव येथील तरूण कौटुंबिक वादातून घरातून निघून गेला होता. आज या तरूणाचा गावालगतच्या विहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुषार गोपाळ राणे (वय-३२ रा. किनगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे. किनगाव येथे तुषार राणे, आई आशा राणे आणि पत्नी रत्ना राणे हे वास्तव्याला आहे. तुषार राणे आणि त्याची पत्नी यांच्यात कौंटुबिक वाद काही दिवसांपासून होता. त्यामुळे तुषार मानसिक तणावात होता. रविवारी तुषार व त्याची आई आशा सोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री तुषार कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला . हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीला आला. परिसरात तुषारचा शोध घेतला असता मिळून न आल्याने आई आशा राणे यांनी यावल पोलीसात माहिती दिली. आशा राणे यांच्या खबरीवरून तुषार राणे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, आज तरूणाचा गावालगत विहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.