आंबेडकरनगरातील प्रौढांची डोके ठेचून हत्या

जळगाव ( प्रतिनिधी ) – कालची निमखेडी रॊड परिसरातील हत्येची घटना ताजी असताना आज आंबेडकरनगरात एका प्रौढांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यावर जळगावात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील रथचौकाशेजारी असलेल्या आंबेडकरनगरात ही खुनाची घटना घडली . काल रात्री झोपेत असताना राजू पंडित सोनवणे या ५५ वर्षीय व्यक्तीची डोक्यात तीक्ष्ण हत्यारांनी वार करून आणि अक्षरशः डोके ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही हत्येची घटना उघडकीस आल्यापासून राजू पंडित सोनवणे यांचा पुतण्या आंबेडकरनगरातून गायब असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावरच संशयाची सुई फिरते आहे पोलिसांनी शोध सुरु केला असला तरी लगेच पोलिसांच्या हाती महत्वाचे काही धागेदोरे लागलेले नाहीत.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून राजू सोनवणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालायात पाठविला शनी पेठ पोलीस ठाण्याचे पथक या हत्याकांडाचा तपास करीत आहे.
काल आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या बापाची निमखेडी रॊड भागात त्याच्या दोन मुलांनीच हत्या केली होती . या आरोपी मुलांना कालच पोलिसांनी अटक केली होती.







