जळगाव शहरातील धक्कादायक घटना, महिलेचे झाले काय ? अद्यापही गूढ..!
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील खोटे नगर भागातील धनश्री नगरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेचा ३० लाख रुपये मिळण्याच्या लालसापोटी २ जणांनी जीवेठार मारून त्यांच्या मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहलता संजय चुंबळे (वय ६०, रा. धनश्री नगर खोटे नगर जळगाव), असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून असा परिवार आहे. स्नेहलता अनंत चुंबळे या साळवा, ता. धरणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांत नर्स या पदावर नोकरीस होत्या. मागील वर्षी एप्रिल २०२३ मध्ये सेवानिवृत्त झालेली आहे. दिनांक १७ ऑगस्ट रोजी आई स्नेहलता हि नाशिक येथून जळगांव येथे ग.स. सोसायटीची मिटींग कामी आलेली होती.(केसीएन)नंतर खोटे नगर येथे असलेल्या घरी थांबली होती. दि. १८ रोजी नुतन मराठा कॉलेज येथे ग.स. सोसायटी मिटींगला हजर होती. त्यानंतर दि. २० रोजी पावेतो स्नेहलता जळगांव येथेच थांबलेल्या होत्या.
स्नेहलता यांनी तिचे मोबाईल क्रमांक यावरुन पती संजय देशमुख यांना सांयकाळी ७ वाजेचे सुमारास फोन करुन सांगितले की, माझे जळगांवचे काम झाले असून मी नाशिककडे येण्यासाठी निघालेली आहे. रात्री ११ वाजे पावेतो येत आहे. तरी मी पोहचल्यावर तुम्ही मला घेण्यासाठी स्टेशनवर या असे कळविले होते.
त्यानंतर रात्री स्नेहलता हिची कुटुंबीयांनी वाट पाहीली. परंतु त्या नाशिकला आल्या नाही. मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता तो बंद होता.(केसीएन)परिवाराने शोधाशोध केली मात्र मिळवून आल्या नाही. स्नेहलता यांची मुलगी मयुरी देशमुख हिने परिवाराला सांगितले की, मामा सुनिल शिंदे रा. चांदसर ता. धरणगाव यांच्याकडून तिला समजले की, आई स्नेहलता हिस नाशिक येथे प्लॅट घ्यावयाचा असल्याने जळगांव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, कृषी विकास शाखा, रिंग रोड जळगांव येथून तिने ३० लाख रुपये काढले असून त्यावेळेस आई सोबतच काम करणारा इसम नामे जिजाबराव पाटील हा देखील पैसे काढतांना तिचे सोबत होता. त्यानंतर दिनांक २२ ऑगस्ट रोजी जळगांव येथील नातेवाईकांकडेस शोध घेतला परंतु मिळून न आल्याने जळगांव तालुका पोलीस स्टेशनला आई बेपत्ता झाल्याबाबत मुलाने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, स्नेहलता चुंबळे या वृद्ध महिला आपल्या वास्तव्याला होत्या. दरम्यान त्यांच्याकडे ३० लाख रुपये आहे. अशी माहिती जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगनाथ निकम दोन्ही रा. अमळनेर यांना मिळाली. त्यानुसार दोघांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ३० लाख रुपये मिळण्याच्या लालसापोटी दोघांनी वृध्द महिलेचा घातपात करून जीवे ठार मारले आहे. आणि त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावण्यात आले आहे अशी तक्रार समीर संजय देशमुख (वय २८ रा. धनश्री नगर खोटे नगर, जळगाव) यांनी दिली आहे.
त्यानुसार मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.