• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खुनाचा आरोपी मिळाला, हत्यार-कपडे देखील सापडले पण मृतदेह मात्र मिळेना !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

पहूर येथील घटनेचे एलसीबीपुढे आव्हान, ४० दिवसांनी झाला उलगडा

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील जाभुंळ गावातील बेपत्ता इसमचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने (एलसीबी) याप्रकरणी कसून तपास केला आहे. मयत इसमाच्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान मयत व्यक्तीचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. दरम्यान संशयित आरोपीने खुनासाठी वापरलेला दगड आणि कुऱ्हाड देखील पोलिसांना काढून दिली आहे तसेच, त्याचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू मिळाल्या असून पोलिसांची तपासणी सुरूच आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कैलास विठोबा वडाळे (वय 49, रा. जाभुंळ ता. जामनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. ते शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान 13 मे रोजी दुपारी 3 वाजेनंतर कधीतरी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पहुर पोलीस स्टेशनला 14 मे ला त्यांचा मोठा मुलगा अविनाश वडाळे याने दाखल केली होती.

कैलास वडाळे यांच्या कुटुंबीयांनी संशयित म्हणून त्यांचा मित्र रमेश मोरे याचे नाव पहूर पोलिसांना सांगितले होते. मात्र पहूर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. महिनाभर पहूर पोलीस बेपत्ता वडिलांचा कुठलाच शोध घेत नाही हे पाहून कैलास वडाळे यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी याबाबत तपास एलसीबीला करण्याचे सांगितले होते.

एलसीबीने बेपत्ता इसमाचा दोन दिवसात उलगडा केला. सदर इसमाचा मित्र रमेश मोरे (वय ५४, रा.वडाळी ता.जामनेर, व्यवसाय : ट्रॅक्टर चालक) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी खून केल्याची कबुली दिली. घटनास्थळ देखील दाखवले. घटनास्थळी मयताचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू मिळून आल्या मात्र मृतदेह मिळाला नाही. त्याबाबत त्याला विचारले असता त्याने अजूनही समाधानकारक उत्तरे दिलेली नाही. खुनासाठी वापरलेला दगड आणि कुऱ्हाड देखील त्याने काढून दिली असल्याचे समजते त्यामुळे मृतदेह शोधण्याबाबत आता एलसीबी समोर फार मोठे आव्हान उभे आहे.

मात्र येत्या दिवसात घटनेचा पूर्ण उलगडा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान मयत कैलास वडाळे यांनी संशयित आरोपी रमेश मोरे याला वीस हजार रुपये उसनवार दिले होते. ते पैसे परत मागितल्याचा राग आल्यावरून रमेश मोरे याने हा खून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.दरम्यान कैलास वडाळे यांचा मुलगा अविनाश याच्या फिर्यादी वरून पहुर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे आहे.


 

 

Previous Post

साखरपुडा झालेल्या तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

Next Post

हनी ट्रॅप लावून जळगावच्या व्यवसायिकाची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हनी ट्रॅप लावून जळगावच्या व्यवसायिकाची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon