कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर ; तीन जण ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. येथिल शिवाजीनगर भागात इंद्रप्रस्थ नगर परिसरातील खडकेचाळ जवळ एका 25 वर्षीय तरुणाचा अज्ञात तीन जणांनी चाकु या धारदार शस्त्रांनी निर्घुण हत्या केल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमली आहे. तीन मारेकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मयत तरुणाचे नाव भूषण भरत सोनवणे (वय 25) रा. इंद्रप्रस्थ नगर परिसरातील सिध्दीविनायक पार्क जुना कानळदा रोड येथिल रहिवासी आज रात्री 11 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास अतुल काटकर,प्रतिक निबांळकर रा. सिध्दीविनायक पार्क व दुर्गेश उर्फ पपई आत्माराम संन्यास रा. गेंदालाल मिल, जळगाव या तिघांनी चाकुु या धारधार शस्त्राने सपासप वार करून तसेच दगडाने मारून निर्घुण हत्याकेल्याचे उघडकीस आले आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत. मयत भूषण सोनवणे याचे मृतदेह बराच वेळ घटनास्थळी होता. त्याची आई अँब्युलस येत नाही तोवर मृतदेहा जवळ बसून होती. नंतर 108 अँब्युलस मध्ये भूषणला देवकर काँँलेज येथील सिव्हिल शासकीय दवाखान्यात नेले होते. तिथे डॉक्टरांंनी मयत घोषित केल्यानंतर आई तिरोणा भरत सोनवणे सह नातेवाईकांनी आक्रोश केला. यानंतर जळगाव शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले यावेळी हाँस्पिटल जवळ मोठी गर्दी जमा झालेली होती. यांच्या पश्चात लहान भाऊ, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , साय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. आणि तात्काळ संशयित मारेकरी तीघांंना ताब्यात घेतले आहे. आई तिरोणा भरत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेनचे पो.नि. धनंजय येरुळे हे करीत आहेत.
