नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) शादीपूर फ्लायओव्हर रेल्वे ट्रॅकवर अवघ्या १०० रुपयांसाठी एका तरुणाचा गळा चिरून भामट्यानी खून केला असून नसीम आलम असे मृताचे नाव आहे. या हत्येचे गूढ उकलताना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.३६ वर्षीय लाल बाबू असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याचबरोबर दुसरा आरोपी भूमाचा शोध सुरू आहे. पोलिसांची अनेक पथके त्याचा शोध घेत आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, नसीम सोमवारी रात्री उशिरा त्याचा मित्र तौकीर अन्सारीसोबत गांजा खरेदी करण्यासाठी जात होता. यादरम्यान आरोपींनी नसीमला थांबवून गांजा खरेदी करण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. न दिल्याने भूमा आणि लाल बाबूने त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत.