कोल्हापूर (वृत्तसंस्था ) पती पत्नीच्या भांडणातून पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील आसुर्लेपैकी दरेवाडी येथे घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनिता बाबासो जाधव (वय ४६) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र साळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी बाबासो बळवंत जाधव (वय ५०) यांना पन्हाळा पोलिसांनी मध्यरात्री राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याने आपल्या कृत्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान अनिता यांचा पती हा व्यसनाधीन असल्याने तो सतत पत्नीकडे पैशांची मागणी करीत असल्याने झालेल्या भांडणातून या खुनाची घटना घडली आहे. पुढील तपास पन्हाळा पोलिसा निरीक्षक अरविंद काळे करत आहे.