विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खिरवड येथे दि. ८ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय, खिरवड येथे सरपंच पुनम गोपाळ कोळी आणि भाजपा तालुका महिला अध्यक्षा आशा राजेंद्र सपकाळे यांच्या उपस्थितीमध्ये महिला दिवस साजरा करण्यात आला.
यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयत सदस्यांनी हजेरी लावली होती. त्यात प्रामुख्याने ललिता प्रकाश चौधरी, मंगला चंद्रभान संन्याशी, अंगणवाडी सेविका कविता कोंघे, संगीता चौधरी, कोकिळा गाढे, आशा वर्कर रंजना कोळी, मंदा भालेराव तसेच पंचायत अधिकारी एच. डी शिरसाठ, समाज सेवक चंद्रभान संन्याशी, प्रकाश चौधरी, सुलभा विकास चौधरी, जिल्हा परिषदेची मराठी शाळा मुख्याध्यापक दीपक पाटील तसेच उपशिक्षक, ग्रामपंचायत लिपीक संतोष गाढे,रोजगार सेवक विशाल कोंघे, काशिनाथ कोळी आणि संगणक ऑपरेटर हिरामण गाढे इत्यादींचा समावेश होता. तसेच यावेळी शालेय विदर्यीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी राष्ट्रमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिलांच्या कार्याची माहिती देण्यात आली.