विविध तालुक्यातून भाविकांची उपस्थिती
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील सामाजिक एकोप्याचे प्रतिक असलेले स्थान म्हणजे हजरत सय्यद कादरी शाह बाबा यांचा ऊर्स सालाबाद प्रमाणे या यावर्षीही मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
या अनुषंगाने गावात कुराण पठणच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविक मान्यवरांच्या हस्ते दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. तसेच या वेळी गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी खिर्डी परिसरातील अनेक भाविकांनी व गावातील नागरिकांनी कादरीशाह बाबांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. या वेळी प्रामुख्याने, सुन्नी जामा मस्जिद चे मुत्वल्ली शेख अस्लम, शेख शब्बीर, शेख सलमान, अकबर खान, शेख गुलाब, शेख फिरोज, इम्रान खाटीक आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.