अध्यक्षपदी ॲड. संदीप भंगाळे यांची निवड
चंदकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी येथिल विद्या विकास मंडळ संचलित शांताबाई प्रल्हाद राणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ॲड. संदीप भंगाळे यांच्या सरस्वती पॅनल मधील उमेदवार विजयी झाले आहे.
ॲड भंगाळे यांची पाचव्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा विलास पाटील बिनविरोध करण्यात आली. तसेच सचिव म्हणून घनश्याम भंगाळे याची बिनविरोध निवड करण्यात आली होती. या संस्थेच्या ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. एकुण ११ जागासांठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. यात सरस्वती पॅनलचे ८ उमेदवार विजयी झालेले यात एकूण ११२ मतदार होते. त्यापैकी ९७ मतदान झाले आहेत. विजयी उमेदवार भरत लढे (मते ६०) मदन बिपीन झोपे (६९), दत्तात्रय फलक (८१), हेमराज किरंगे (७२), पंकज महाजन (७१), राजेंद्र महाजन (७१),सुनील इंगळे (७५), सुनील कोल्हे (८७) असे एकुण १० पैकी ८ उमेदवार निवडूण आले.
सुरेश भंगाळे यांना ५४ मते मिळाली व ते पराभुत झाले. तसेच अनिल चौधरी यांनी सरस्वती पॅनलला पांठीबा दिला होता. त्यांना ७ मते मिळाली आहेत. ते ही पराभुत झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयंत चौधरी, ललीत फिरके, किशोर चौधरी, अतीश मेघे व शिपाई दिपक चौधरी यांनी काम पाहिले. सर्व संचालक मंडळाचे शाळेचे मुख्याध्यापक अशोक भंगाळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.