रावेर तालुक्यात मतदारांचा उत्साह
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे रविवार ५ नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायतच्या सर्वत्रित निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीत एकूण ३१७२ पैकी २३७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळ पासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. त्या मुळे मतदानाविषयी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
निवडणूकीत गावात एकूण चार वॉर्ड असून वॉर्ड क्रमांक १ मध्ये ९७० पैकी ७६९, वॉर्ड क्रमांक २ मधून ७४१ पैकी ५४२, वॉर्ड क्रमांक ३ मधून ७०५ पैकी ४६७, तसेच वॉर्ड क्रमांक ४ मधून ७५६ पैकी ६०१ इतके मतदान झाले. एकूण मतदानाची टक्केवारी ७५% आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील, रिजवान पिंजारी, स्वप्नील पाटील, पोलिस नाईक काजिम देशमुख, पंकज सोनवणे, प्रियांका नरवाडे आदी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या प्रसंगी खिर्डी बुद्रुक पोलीस पाटील रितेश चौधरी, खिर्डी हेमंत जोशी, मंडळ अधिकारी प्रविण नेहेते, ग्रामसेवक एस. आर. पाटील तसेच ग्राम पंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.