असंख्य खातेदारांनी घेतली माहिती
रावेर (प्रतिनिधी) : लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “महसूल पंधरवडा-२०२४”साजरा करण्यात येत आहे. या उद्देशाने खिर्डी बु ता.रावेर येथे फेरफार अदालत शिबीर घेण्यात आले. . प्रलंबीत असलेल्या नोंदी निर्गत करणेबाबत कार्यवाही करण्यात आली.
शासन निर्णयानुसार महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होवून त्यांना योग्य लाभ घेता यावा यासाठी विशेष मोहीमच तालुकाभरात राबविण्यात येत आहे . याचाच एक भाग म्हणून अदालत शिबीर घेण्यात आले. शेतकऱ्यांना ई हक्क, ई फेरफार बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे खातेदारांच्या ई हक्क व ई फेरफार बाबतच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. या प्रसंगी मंडळ अधिकारी प्रविण नेहेते,तलाठी खिर्डी हेमंत जोशी ,तलाठी तांदलवाडी स्मिता कोळी, कोतवाल अनंत कोळी, सरपंच , ग्रामसेवक,ग्रा.सदस्य व मंडळातील खिर्डी,शिंगाडी, तांदलवाडी, बलवाडी, गाते सजेतील असंख्य शेतकरी उपस्थित होते.