खिर्डी ता. रावेर (प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील विलास श्रीराम पाटील यांची भाजपच्या तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आली असून पक्षीय धुरा जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या मुळे तसेच तालुका पातळीवर उत्तम कार्य केल्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी भाजप किसान सेलचे अध्यक्ष सुरेश धनके,भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जि .प.सदास्य नंदकिशोर महाजन, शिवाजी पाटील,युवा मोर्च्यांचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, प.स.सभापती कविता हरीलाल कोळी, विकास अवसरमल, हरीलाल कोळी, भरत महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.