पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील खेडीढोक येथे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता विठ्ठल मंदिर चौकात महाराणा प्रताप स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदर स्मारकाचे लोकार्पण अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे ,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. चिमणराव पाटील हे असतील,तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना कोअर कमिटी अध्यक्ष महाराष्ट्रराज्य व जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, मोहाडीचे सरपंच रामचंद्र महादू पाटील,शेतकी संघाचे संचालक चतुर पाटील, म्हसवेचे माजी उपसरपंच साहेबराव पाटील, सेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, दगडी सबगव्हाणचे माजी सरपंच नंदलाल पाटील,शेतकी संघ माजी व्हा चेअरमन जिजाबराव पाटील,सावखेडे होळ सरपंच हरसिंग राजपुत,हिरापूर सरपंच वाल्मीक पाटील, भोकरबारी सरपंच राहुल पाटील, शेळावे सरपंच किरण पाटील,राजवडचे राजेंद्र परदेशी, सुनिल पाटील, विटनेर या मान्यवरांचे शुभहस्ते व परिसरातील जेष्ठ, श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी पंचक्रोशीतील समाजबांधव व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शिरीषदादा चौधरी मित्र परिवार शिवसेना युवा सेना, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व समस्त ग्रामस्थ खेडीढोक यांनी केले आहे.