जळगावातील संशयिताला अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरापासून जवळ असलेल्या खेडी बसस्थानकजवळ लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणावर पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश प्रकाश सपकाळे (वय २१ रा. हरीओम नगर, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावाच्या बसस्थानक परिसरात संशयित आरोपी कमलेश सपकाळे हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी ११ मार्च रोजी रात्री ९ वाजता पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.