• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता घटस्थापना नव्हे तर विजयादशमी ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2020
in जळगाव
0

चर्चेतील नाथाभाऊंचे पक्षांतर लांबणार

जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे माजी महसूल मंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि अनेक दिवसांपासून ज्यांच्याभोवती चर्चेचे वलय निर्माण झाले आहे असे एकनाथराव खडसे यांचा घटस्थापनेचा मुहूर्त आता बदलला असल्याची माहिती मिळत असून विजयादशमीच्या दिवशी ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील अशी नवीन माहिती हाती आली आहे. विजयादशमी दिवशी ते नेमके कोणते सोने लुटणार, कोणत्या रावणाचे दहन करणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र स्वतः एकनाथराव खडसे यांनी, चुकीची माहिती आहे, अजून काही नाही अशी सावध प्रतिक्रिया देत पक्षांतराविषयी अद्यापही बोलणे टाळले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार म्हणून चर्चा सुरु आहे. या चर्चेत त्यांचे समर्थक आणखी भर घालीत आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते पक्षांतर करतीलच असे सांगितल्याने उत्सुकता वाढली आहे. जामनेरच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमाला देखील जाणे खडसेंनी टाळले. तेथे देवेंद्र फडणवीस-खडसे भेट झाली नाही. त्यात गुरुवारी १५ रोजी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते खडसेंच्या भेटीला गेले आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत या अशी मागणी केली.

भारतीय जनता पक्षाचे गेले ४० वर्षे झाले निष्ठावंत असलेले खडसे आज मात्र पक्षात एकाकी पडले असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने अलीकडे त्यांना विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, राज्यपाल यासह राष्ट्रीय कार्यकारिणी यापैकी कोठेच स्थान दिले नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे अगदी अलगद बाजूला एकनाथरावांना ठेवण्यात आले. मात्र मंत्री म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून सभागृह दणाणून सोडणारे नाथाभाऊ आज भाजपाला का नकोसे झाले त्याचे उत्तर भाजपा देत नाही. ते आमचे जेष्ठ नेते आहेत असे म्हणतात मात्र त्यांना जेष्ठत्वाप्रमाणे मान न ठेवता वृद्धाश्रमात सोडून दिल्यासारखे भाजपने वर्तन ठेवले आहे. मंत्रिपदावर असताना त्यांनी आरोप झाल्यामुळे राजीनामा दिला. अद्यापि क्लीनचिट न मिळाल्याने माझा गुन्हा काय हे भाजपने सांगितले नाही.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची चाचपणी केल्यानंतर, वडीलधारी शरद पवारांशी बोलल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातही घटस्थापनेला खडसे पक्षांतर करतील अशी चर्चा जोर धरत असतानाच घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर नाथाभाऊ समर्थकांच्याच गोटातून नवीन माहिती समोर येत आहे. माजी आमदार, माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, इतर भाजपा पदाधिकारी असा मोठा लवाजमा खडसेंच्या मागे जाणार असल्याने अजून प्रवेश वेट अँड वोच आहे. म्हणून आता थेट विजयादशमीला सीमोल्लंघन करून नाथाभाऊ कोणते सोने लुटतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

याबाबत एकनाथराव खडसे यांच्याशीच संवाद साधला असता ते म्हणाले की, पक्षांतराची माहिती चुकीची आहे, अजून काहीही नाही एवढी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंनी वाढविलेल्या उत्सुकतेमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला आणखी उधाण आले आहे.


 

 

Previous Post

चोपडा शहर पोलिसांची कारवाई , मोटारसायकल चोरास अटक

Next Post

लवकरात लवकर या मारेकऱ्यांना पकडण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या – खासदार रक्षाताई खडसे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लवकरात लवकर या मारेकऱ्यांना पकडण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या - खासदार रक्षाताई खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon