धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील खर्दे येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याची घटना घडली . संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठाबाई नामदेव जाधव ( रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड हल्ली मुक्काम खर्दे तालुका धरणगाव ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विठाबाई जाधव पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करत. ३० डिसेंबररोजी सायंकाळी विठाबाई जाधव घरी असताना पती नामदेव जाधव विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी दारू पिली असल्यामुळे त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत होती. याचा राग आल्याने नामदेव जाधव याने लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात व चेहर्यावर मारून तिला बेशुद्ध केले.
जखमी अवस्थेत नामदेव जाधव यांनी पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले होते. चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. नामदेव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि गणेश अहिरे करीत आहेत .