एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा येथील दारूच्या नशेत विषारी औषध घेतलेल्या ४८ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दिनांक ५ जुलै रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकनाथ त्र्यंबक भील (वय-४८ रा. केवडीपूरा ता. एरंडोल) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. एकनाथ भील हे वडील त्र्यंबक भील आणि मुलगा गणेश यांच्यासह केवडीपूरा येथे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होते.(केसीएन) दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावाजवळी अंजनी धरणाजवळ त्यांनी विषारी औषध सेवन केले. हा प्रकार गावातील नागरीकांना समजल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांना तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचा मृत्यू झाला. (केसीएन)वैद्यकीय अधिकारी निरंजन देशमुख यांनी तपासून मयत घोषीत केले. या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.