पावसाळा ऋतूत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
जळगाव– सोमवार रोजी चोपडा तालुक्यातील कमळगाव, चांदसरी, अडावद, पांढरी, मितावली, पिंपरी या गावात पाणीपुरी तून विषबाधा होऊन शेकडो रुग्णांना प्रकृती खराब झाली. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी चोपड्यासह अडावद येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपुस केली. यात दोन वर्षाच्या बालकापासून ते वयोवृद्ध महिलेलाही विषबाधा झाली आहे, काळजी करू नका, लवकर बरे व्हाल, यापुढे पावसाळा तब्बेतीची काळजी घ्या असा सल्ला डॉ केतकी पाटील यांनी दिला.
या भेटीवेळी डॉ केतकी पाटील यांच्या समवेत भाजपाचे माजी शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष कमलेश पाटील, ता.सरचिटणीस दीपक भोसले, पंचायत राजचे पदाधिकारी तुषार पाठक, यु. मो. शहर सरचिटणीस विशाल भावसार,शहर कोषाध्यक्ष धीरज सुराणा, गोपाल पाटील,संदीप चव्हाण, जितेंद्र महाजन, भाजपाच्या शहर उपाध्यक्ष अनिताताई नेवे, शहर सरचिटणीस अरुणाताई पाटील हे उपस्थित होते.
या प्रादुर्भावा संदर्भात जळगाव येथील आर एम ओ डॉ. सुपे, डॉ,बाभळे, डॉ.नीलिमा देशमुख, इन्चार्ज डॉ.सागर पाटील, तृप्ती पाटील, सिस्टर शिंदे, सिस्टर एम एस धमके आदी उपस्थित होते. संपूर्ण स्टाफ रुग्णांच्या सेवेत असून त्यांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन आपल्या घरी सुखरूप परतावे याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी डॉ केतकी पाटील यांनी चर्चा केली.