जळगाव ( प्रतिनिधी ) – केळी व्यापारी बोर्ड भावापेक्षा कमी भाव देत केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करतात . व्यापाऱ्यांच्या या मनमानीविरोधात लाक्षणिक उपोषणाचा इशारा देत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रार केली आहे

या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की , जिल्ह्यात सध्या केळीची कापणी व्यापाऱ्यांकडून बोर्ड भावापेक्षा जवळपास ६०० रुपये कमी भावाने केली जात आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांची हित बाजार समितीकडून जपले जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या या पिळवणुकीला वाचा फोडण्यासाठी आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत या आधीच्या दुष्काळातील होरपळला गेलेला शेतकरी सध्या मोठ्या कष्टाने केळी पिकवतोय या आधीच्या वर्षात वादळी पावसाने केळीचा घात केला आहे खरेदीदार म्हणून परवाने नसलेले दलाल शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक करीत आहेत बाजार समित्यांनी जाहीर केलेल्या भावात केळीची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात नाही उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी काकुळतीला आला आहे आधीच कोरोना आणि अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी आपली बाजू कुणीच घेत नसल्याने हतबल झालेला आहे
व्यापाऱ्यांनी केळीची खरेदी बोर्ड भावानुसार फरकासह खरेदी करावी , शेतकऱ्यांकडून खरेदी करणारा व्यापारी परवानाधारकच असावा , अशा परवानाधारक व्यापाऱ्यांची नावे बाजार समित्यांनी वर्तमानपत्रात त्यांच्या संपर्काच्या क्रमांकासह प्रसिद्ध करावीत , राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई शेतकऱ्यांना द्यावी , अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत .
या निवेदनावर प्रा भाऊसाहेब सोनवणे , छोटू पाटील (सरकार) , चंद्रभान पवार , संजय बडगुजर , अधिक पाटील , राजेंद्र पवार आदींच्या सह्या आहेत हे निवेदन मुख्यमंत्री , राज्यपाल , विधानसभेतील विरोधी पक्षनेते , जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आले आहे.







