चोपड्यात झाली पक्षाची जाहीर सभा
चोपडा (प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून सत्तेचा सतत गैरवापर सुरु आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. शेतमालाला हमीभाव मिळेना झाले आहे. इंधनाचे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत बदल घडला पाहिजे. त्यासाठी महाविकासाआघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून जनतेने निवडून द्यावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
रावेर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सभा संपन्न झाली.या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत,आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसेंजित पाटील, चोपड्यातील कैलास पाटील, माजी आ. अरुण पाटील, माजी आ. रमेश चौधरी, माजी आ. डॉ. बी. एस. पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी आ. दिलीप सोनवणे उपस्थित होते.
यासोबत विनायक नाना पाटील, इंदिराताई पाटील, गोरख पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, घनश्याम पाटील, विजयाताई पाटील, नीलम पाटील, प्रतिभा शिंदे, जगन पाटील, सुरेश पाटील, जगन सोनवणे, चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, चोपडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे चोपडा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रहास गुजराती यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. रवींद्र पाटील यांनी आभार मानले.