जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव गुन्हा शाखेने नायलॉन मांजा विक्री प्रकरणी कासोदा येथील वसंत किराणा स्टोअर्सचे मालक किरण वाणी व योगेश जनरल स्टोअर्सचे मालक योगेश वाणी यांच्याविरुद्ध पो कॉ सतीश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आहे. त्यांच्यासह पो ना भगवान पाटील , नंदलाल पाटील, राहुल बैसाणे यांनी ही कारवाई केली. कारवाई करतेवेळी दोघा दुकानांमध्ये १०३८ रुपयाच्या प्लास्टिक पिशवी मध्ये ठेवलेले नायलॉन माझा प्रत्येकी दहा रुपये किमतीचे शंभर बंडल कारवाई आढळून आले.
पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनच्या सपोनि नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ युवराज कोळी करत आहेत.