शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील कक्षसेवक दिलीप बारकू माळी यांचे ८ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याबद्दल शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी अधिष्ठाता दालनात त्यांना डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी वर्गातर्फे आदरांजली वाहण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले दिलीप बारकु माळी यांचे दि. ८ रोजी अल्पशा आजारामुळे निधन झाले. दिलीप माळी हे स्वभावाने मनमिळावू असल्यामुळे रुग्णांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील प्लॅस्टर रूम मध्ये त्यांनी रुग्णसेवा उत्तमप्रकारे बजावलेली आहे. माळी कुटूंबीयावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देवो अशी भावना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी व्यक्त केली.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, संजय चौधरी, डॉ. प्रवीण लोहार, दिलीप मोराणकर, निलेश बारी, जे. एन. गवळी, नरेंद्र वाघ, ज्ञानेश्वर डहाके, विजय जगताप, ज्ञानेश्वर राठोड, किरण बाविस्कर, प्रदीप जयस्वाल, गोपाल सोळुंके, विजया बागुल, अजय जाधव, महेंद्र पाटील, विजय बाविस्कर, मंगेश बोरसे, किशोर जाधव, सुभाष पाटील, रवींद्र पाटील, दीपक पांढरे, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.