ठाणे ( प्रतिनिधी ) – मुंबई – नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर रेल्वे रुळालगत कोसळला आणि काही क्षणात भरधाव रेल्वे रुळावर आली मात्र ट्रक रुळाच्या बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला.
ट्रक क्रमांक. एम एच 15 इ व्ही 9826 घाटाचे संरक्षक कठडे तोडून अडीचशे फूट दरीत रेल्वे रूळालगत जाऊन कोसळल्या. अपघातावेळी चालकाने उडी मारल्याने तो बचावला कंटेनर (ट्रक) चा मात्र पूर्ण चक्काचूर झाला अपघातग्रस्त ट्रक रेल्वे मार्गांवर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकल्याने अनर्थ टळला
ट्रकचालक अनिल श्रीकृष्ण रोडे. (रा.बीड ) कसारा घाट चढत होता. हिवाळा ब्रिजच्या अलीकडील वळणावर अज्ञात वाहणाने ओव्हरटेक करतेवेळी हूल दिली. त्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटला व ट्रक थेट दरीत कोसळला. वाहनचालक अनिल रोडे यांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेत आपला बचाब केला पण ट्रक थेट दरीत जाऊन रेल्वे बोगद्याच्या कठड्याला अडकला.आपत्ती व्यवस्थापन टीम, महामर्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस, टोल यंत्रणा 1033 च्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.ट्रकचा चालक सुखरूप असल्याने त्याला कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अजून एक फूट जरी ट्रक पुढे गेला असता तर तो रेल्वे ट्रक वरच पडला असता.