राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा संवादातून बदलाचा संकल्प
रावेर – विकास हा कार्यालयात बसून साधता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भावना समजून त्यांचा आदर करून विकासाच्या वाटा शोधाव्या लागतात. असे विचार मांडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी विविध भागांमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत . संवादातून बदल व विकासाचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीराम पाटील यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत असून मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करण्याचा संकल्पव कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
दसरखेड ता.मलकापूर येथील मराठा कामगार सेना तालुका प्रमुख श्री.संतोषभाऊ मराठे यांच्या कार्यालयाला आज श्रीराम पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थित श्री.संतोषभाऊ साठे व सहकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी श्री.साठे यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदुरा/ मलकापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश एकडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासोबत श्रीरामपाटील यांनी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर येथे महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद श्रीराम पाटील यांनी संवाद साधत केवळ राजकारणासाठी नाही तर पवार साहेबांच्या विकासाच्या व्हिजन साठी आपल्याला लढायचे असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी सांगूतले. महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे महाविकास आघाडीचे नेते पदाधिकाऱी यांच्यासोबत ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी विविध समस्या बाबत चर्चा करून आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. गावपातळीवरूनच राष्ट्राचा विकास शक्य असून सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले.