• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांना पाहताच दोघांनी नदीत घेतल्या उड्या, मात्र शिताफीने वाचले दोघांचे जीव !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2023
in Uncategorized
0
पोलिसांना पाहताच दोघांनी नदीत घेतल्या उड्या, मात्र शिताफीने वाचले दोघांचे जीव !

भोपाळ येथील घटना, विद्यार्थिनीला पळविणाऱ्या जामनेरच्या शिक्षकाचा कारनामा

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बारावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन फरार झालेल्या शिक्षकाला पोलिसांनी भोपाळ जिल्ह्यातून शिताफिने ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून दोघांनी नदीत उड्या मारल्या. त्यात पोलिसांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत विद्यार्थिनीला वाचविले. तेथून दोघांना ताब्यात घेऊन करमाड पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. घटनेतील शिक्षक हा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रहिवासी आहे.

लाडसावंगी ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी संगणक प्रशिक्षण केंद्रावर शिकवणीस येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने पळवून नेल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. संशयित आरोपी महेंद्र त्र्यंबक साठे (वय ४२) ह.मु. करमाड ता. संभाजीनगर असे शिक्षकाचे नाव आहे. १२ जून रोजी या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला लाडसावंगी येथील बायपास रोडवरील पुलाजवळुन पळवून नेले होते. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलीस ठाण्यात या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होता. तेव्हापासून करमाड पोलीस आरोपीच्या मागावर होते. सायबर सेलचे पोलीस योगेश तलमरे यांच्या तांत्रिक मदत घेऊन करमाड पोलीस ठाण्याचे पीएसाआय ढाकणे याच्या नेतृत्वाखाली एक पथक ४ जुलै पासून गोपनीय पद्धतीने आरोपीच्या मार्गावर होते.

तांत्रिक पुराव्याच्या आधारे पाठलाग करत असताना मध्य प्रदेशातील
भोपाळ जिल्ह्यातील नेमवार गावच्या मंदिरासमोर पोहोचल्यानंतर पोलिसांना एका नदीच्या पायऱ्यावर बसलेला शिक्षक व अल्पवयीन मुलगी करमाड पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांना बघताच संशयित महेंद्र साठे याने विषारी द्रव्य तोंडात घेऊन पाण्यात उडी मारली. हे पाहून अल्पवयीन मुलीने देखील पाण्यात उडी मारली. अल्पवयीन मुलीला पोहता येत नसल्याने करमाड पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार दादाराव पवार यांनी नदीत पाण्यात उडी मारली.

पवार हे जवळ गेल्यानंतर मुलीने पवार यांच्या गळ्याला मिठी मारली. त्यामुळे दादा पवार हे देखील पाण्यात बुडायला लागले. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत ताकदीने मिठी सोडून पाण्यात खोलवर जाऊन त्या मुलीला मागून धक्के मारून सुरक्षित ठिकाणी आणले. नदीच्या काठावर पोहचलेले पोउपनि रामेश्वर ढाकणे, जमादार जयसिंग नागलोत, एक स्थानिक नागरिक यांनी आरोपी व पीडित मुलीस नदीतून बाहेर काढले. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र शिक्षकाच्या शरीरात विषारी द्रव्य भिनले नव्हते, यावरून आरोपी साठे यांनी पाण्यात उडी मारताच विषारी द्रव्य गुळनी करुन थुंकले, असे दिसले. स्वतःचा जीव धोक्यात घालून पोहता येत नसलेल्या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचवणाऱ्या रामेश्वर ढाकणे, पोना दादाराव पवार, जयसिंह नागलोत, नरेंद्र खंदारे यांचे कौतुक होत आहे. दोन दिवसात १६०० किमी चा प्रवास करून करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई पार पाडली.

जिल्हास्तरीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फक्त या मोहिमेबद्दल कल्पना होती. सदर कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, बीट अंमलदार दादाराव पवार, जयसिंग नागलोत, स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र खंदारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


 

 

Previous Post

जळगावातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे निधन

Next Post

ॲपे रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ॲपे रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

ॲपे रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon