रावेर तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक, भोर येथील घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक आणि भोर येथे शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुसुंबा बुद्रूक येथील शेतकरी रवींद्र भीमसिंह पाटील (५०) व भोर येथील शेतकरी मोहन लक्ष्मण गायकवाड (५५) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. भोर येथील लक्ष्मण गायकवाड यांनी २३ ऑगस्ट रोजी विषारी द्रव सेवन केल्याने त्यांचेवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना दि. २६ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची रावेर पोलिसात गुरूवारी नोंद करण्यात आली.
कुसुंबा बुद्रूक येथील शेतकरी रवींद्र पाटील यांनी २१ ऑगस्ट रोजी विषारी द्रव सेवन केले. बऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्यांचे २१ ऑगस्ट रोजी रात्री ११:२३ वाजता निधन झाले. शिकारपुरा (बऱ्हाणपूर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान शून्य क्रमांकाने वर्ग होऊन रावेर पोलिसात ४ ऑगस्ट रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहेत.
याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय चौधरी पुढील तपास करीत आहेत