धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव येथील योगिता हॉटेलजवळ झालेल्या कार व मोटारसायकल अपघातात होळ येथील लक्झरी बसचालक छोटूलाल आधार पाटील (वय – ४७) ठार झाले.
एम एच १९ – ए एक्स – ०८९० क्रमांकाच्या इंडिका व्हिष्टा या कारची व एम एच १९ – एफ – २२८३ क्रमांकाच्या कावासाकी मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या छोटूलाल पाटील यांना धरणगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीष चौधरी यांनी तपासणी करून मृत घोषित केले.
या अपघातात कार व मोटारसायकल यांचे जास्त नुकसान झालेले नाही. पुढील तपास धरणगाव पोलीस करीत आहेत . हॉटेल योगिता गार्डन जवळ गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.