जळगाव शहरातील संचार नगर येथील घटना
जळगांव (प्रतिनिधी) : येथील सेंट लॉरेन्स शाळेजवळील संचार नगर येथे एका सरकारी अधिकाऱ्याची कार अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ हिंदी अनुवादक पदावर कार्यरत असलेल्या डॉ. परेश सनान्से यांच्या मालकीची टाटा टिगॉर(एमएच १९ ई ए ११९) क्रमांकाच्या कारची समोरची मोठी काच दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री परिसरातील अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तु, दगडाच्या सहाय्याने फोडली. याच प्रकारची घटना गेल्या नोव्हेंबर महिन्यात देखील घडली होती. गेल्या तीन महिन्यात एकाच कारची रु.१० हजार किमतीची पुढील काच एकाच ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीने दुसऱ्यांदा फोडण्यात आल्याची माहिती मिळाली. सदर प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करीत आहेत.