अमळनेर तालुक्यातील जानवे रस्त्यावरील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – जानवे रस्त्यावर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले.

कार (एमएच १४ एफएम ६५९९) जानवे रस्त्यावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने वाहनाचा तोल जाऊन ती रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ललित जीवन महाजन (४३), अपर्णा ललित महाजन (४०), डॉ. कुणाल चौधरी (३७), मित ललित महाजन व देवांशी ललित महाजन (६) हे सर्व जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सारे जण उत्तरकार्यासाठी आलेल्या रवींद्र बोरसे यांचे साडू आणि भावाचे शालक असून पुण्याकडे परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत किरकोळ जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले.









