जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरून भागामध्ये हनुमान जयंती उत्सवानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जळगाव लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार यांनी भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी विचार वारसा फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. करण पवार यांनी शिवसेना पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला.
यावेळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी नगरसेवक सुनील महाजन प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रामेश्वर कॉलनी भागामध्ये विचार वारसा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रभाकर पाटिल, नरेंद्र जाधव,नरेंद्र पाटिल, आशिष राजपूत, विनोद ढमाले, गणेश पाटिल, सुनिल वाणी, दिपक मांडोळे, दीपक सनसे, मयुर डांगे, अजय मांडोळे, योगेश सनसे, मनोज पाटिल, प्रकाश तोमर, संकेत म्हस्कर, लोकेश निकम आदी उपस्थित होते.