
नुकसान अहवाल तयार करण्याची कृषी अधिकाऱ्यांना विनंती


जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. अमळनेर तालुक्यात जाऊन त्यांनी संवाद साधला. कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल तयार करण्याची विनंती केली.

अमळनेर तालुक्यातील मौजे रंजाने,अंतुर्ली, धार, धानोरा इ. ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन करण पवार यांनी पाहणी केली. मका, गहू, उन्हाळी बाजरी, लिंबू, पपई, टरबूज इतर फळपिक व भाजीपाला पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना संपर्क साधून तात्काळ नुकसानीचा शेतकरीनिहाय अंतिम अहवाल तयार करण्याची विनंती केली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शिवसेना पक्ष निरीक्षक कारभारी आहेर,से वकराम धुडकू पाटील, जितेंद्र संभाजी पाटील, संभाजी सेवकराम पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील,धोंडू नीलकंठ पाटील, रवींद्र प्रकाश पाटील, सुभाष पाटील, राजेश पाटील, लोटन पाटील, भटू सुरेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









